*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गौमतेची सध्याची दुःखद परिस्थिती बघता भारतातील समस्त साधू संतांनी केंद्र सरकारने उपाययोजना कराव्या यासाठी संपूर्ण देशात गौसन्मान आवाहन अभियानाची सुरुवात केली आहे. त्याचा पहिल्या टप्यात भारतातील 5400 तालुक्यात 27 एप्रिल रोजी गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथे दादावाडी जैन मंदिर, उड्डाणपूल खाली येथून, तर शहादा श्रीराम मंदिर चावडी चौक, नवापूर गणपती मंदिर नगरपालिका जवळ, तळोदा बालाजीवाडा, अक्कलकुवा हनुमान मंदिर पासून तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल, त्यानंतर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री यांना हजारो स्वाक्षरींचे निवेदन दिले जाईल. निवेदनात गौमाता राष्ट्र माता घोषित करणे, केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा' लागू करून देशातील सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावे, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे यासह अन्य मागण्यांसाठी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त गौभक्त गौप्रेमींनी हिंदु बंधू भगिनींनी या गौसन्मान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गौसन्मान आवाहन अभियानाचा वतीने करण्यात आले आहे.



