ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*

  • Share:

*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याच्या संतुलित व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. आधीपासूनच आकांक्षित जिल्हा म्हणून समाविष्ट असलेल्या नंदुरबारमध्ये आता जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांचा समावेश करून आरोग्य, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये अधिक वेगाने आणि परिणामकारक प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यास मोठी चालना मिळणार आहे.  नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली देशातील मागासलेल्या जिल्ह्यांचा झपाट्याने विकास करण्यासाठी जानेवारी 2018 पासून आकांक्षित जिल्हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून, आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, कौशल्य विकास व आर्थिक समावेशन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील 49 कार्यक्षम निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्याच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते. या प्रक्रियेमुळे प्रशासनातील पारदर्शकता, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढीस लागली असून, स्थानिक विकासाला अधिक चालना मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी 7 जानेवारी 2023 रोजी आकांक्षित तालुका कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील तालुक्यांच्या विकासासाठी स्वतंत्र मोजमाप प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आणि नवापूर हे सर्व सहा तालुके आकांक्षित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या तालुक्यांमध्ये आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रांतील 40 प्रमुख निर्देशांकांच्या आधारे कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना नीती आयोगामार्फत विशेष प्रोत्साहन निधी (Award Money) देण्यात येणार असून, यामुळे स्थानिक प्रशासनाला अधिक प्रेरणा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील एकूण 10 जिल्हे आकांक्षित जिल्हे म्हणून निश्चित करण्यात आले असून, 177 तालुक्यांचा आकांक्षित तालुका कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. या सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना तसेच केंद्र पुरस्कृत योजना प्राधान्याने आणि समन्वयाने राबविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला अधिक वेग मिळणार असून, ग्रामीण व आदिवासी भागातील मूलभूत सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आरोग्य सेवा सुदृढ करणे, शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, कृषी उत्पादनक्षमतेत वाढ करणे, रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे आणि पायाभूत सुविधा सुधारणा यांसारख्या विविध अंगांनी जिल्ह्याचा विकास साधण्याचा व्यापक प्रयत्न या कार्यक्रमातून होणार आहे. एकूणच, आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमाच्या विस्तारामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवा वेग मिळणार असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज