ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पवन ऊर्जा आदिवासी कामगार संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे प्रशासनाचे आदेश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पवन ऊर्जा आदिवासी कामगार संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे प्रशासनाचे आदेश*

  • Share:

*पवन ऊर्जा आदिवासी कामगार संघर्ष समितीच्या लढ्याला यश, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे प्रशासनाचे आदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पूर्व भागातील आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणात अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या दीर्घ लढ्याला यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या सुमारे 20 वर्षांपासून सुजलोन या कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर परवानगीशिवाय पोल उभारणे, रस्ते तयार करणे आणि प्रकल्पासाठी जमीन वापरणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी केला होता. या विरोधात “पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय शेतकरी संघर्ष समिती”ने सातत्याने निवेदने, मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला. या संघर्षाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे करत होते. या प्रकरणात सुमारे 300 ते 400 आदिवासी शेतकरी बाधित झाल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांचा आरोप होता की, कंपनीने ना त्यांची पूर्वपरवानगी घेतली, ना शासनाची अधिकृत मंजुरी, आणि तरीही त्यांच्या जमिनींचा वापर वर्षानुवर्षे सुरू ठेवला.
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या सुनावणीनंतर तहसीलदार, नंदुरबार यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर 24 जून 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित कंपनीने अतिक्रमण हटवावे किंवा रेडीरेकन दराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल 8 ते 9 महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यापूर्वी या समितीने महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती कडेही निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती. दरम्यान, आज तहसील कार्यालयात परिविक्षाधीन आयएएस अधिकारी तथा तहसीलदार शिवांश सिंग यांच्या दालनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला समिती अध्यक्ष अरुण रामराजे, दौलत भिल, बळीराम भिल, अंबरसिंग भील, तनु भिल, भीमराव सामुद्रे, शत्रुघ्न भिल याचासह बाधित शेतकरी, संघर्ष समितीचे प्रतिनिधी आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान तहसीलदारांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत, शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश दिले. प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे कंपनीवर दबाव वाढला असून, अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार, येत्या सोमवारपासून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. एकीकडे हा निर्णय आदिवासी हक्कांसाठीच्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करण्याची गरजही अधोरेखित होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज