ताजा खबरे:
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा-ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रवासी महासंघाची मागणी पालकमंत्र्यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा-ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रवासी महासंघाची मागणी पालकमंत्र्यांना निवेदन*

  • Share:

*नंदुरबार शहरात  सिटी बस सुरू करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा-ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रवासी महासंघाची मागणी पालकमंत्र्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा निर्मिती होऊन 28 वर्षाचा  कालावधी झाला आहे. नंदुरबार शहरात  सिटी बस सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा असे प्रवासी महासंघाने  निवेदनात म्हटले  आहे. शहरात सिटी बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रवासी महासंघ नंदुरबार शाखेने केली आहे.
याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे  यांना पत्र देण्यात आले होते. त्यांनी जिल्हा नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी आणि नगर पालिका तसेच एसटी आगार यांना सूचना दिल्या होत्या. मात्र याबाबत कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पुन्हा निवेदनातून मागणी करण्यात येत आहे. नंदुरबार शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून  नंदुरबार जिल्हा निर्मितीस 28 वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्हा शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी सिटीबस सेवा नसल्याने याबाबत प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. नंदुरबार  जिल्हा निर्मिती झाल्यानंतर विविध शासकीय कामानिमित्त सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यासह  जिल्ह्यातील  नागरिकांचे नंदुरबार शहरात येणे - जाणे सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, मिनी मंत्रालय जिल्हा परिषद, आदिवासी प्रकल्प कार्यालय, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय, मध्यवर्ती कारागृह, पासपोर्ट कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, जात पडताळणी कार्यालय, आरटीओ, आदी शासकीय कार्यालये शहरापासून लांब आहेत. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक बससेवा उपलब्ध होण्याबाबत यापूर्वीही ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघाने निवेदन दिले होते. नगर पालिका आणि राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक तसेच नंदुरबार आगार प्रमुख यांना नंदुरबार शहरात सिटी बसबाबत पत्र देण्यात आले. याशिवाय नवापूर, शहादा, तळोदा या भागातून येणाऱ्या नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेस नंदुरबारचे मुख्य बसस्थानक ते नवापूर चौफुली पर्यंत आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत  प्रवाशांना चढ-उतार घेणे बाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच स्टेट बँक व नाट्य मंदिर स्टॉप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, धानोरा रोड, करण चौफुली, आदी ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी  प्रवासी निवारा उभारण्याची आवश्यकता आहे.
शहरात समांतर सिटी बस सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी संचलित  ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुरेश जैन, तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, सदस्य बी.डी. गोसावी, वैभव करवंदकर, डॉ. गणेश ढोले, ऍड. निलेश देसाई, ऍड. मोहन बोडस, भरत माळी, अपेक्षा चव्हाण, अबोली चंद्रात्रे, अशोक यादबोले, दर्शन ठक्कर, नितीन पाटील, रघुनाथ अहिरे, जगदीश ठाकुर आणि सदस्यांनी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026
*गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत, भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन*
April, 24 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रमात नंदुरबारच्या सर्व तालुक्यांचा समावेश, सर्वांगीण विकास आणि विविध क्षेत्रांत बनेल प्रगतीचा नवा रोडमॅप*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज