*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
*नंदुरबार येथे 8 व्या ‘राष्ट्रीय पोषण पंधरवड्या’निमित्त प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत देशभर 8 वा 'राष्ट्रीय पोषण पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. 'सही पोषण - देश रोशन' या ब्रीदवाक्याला अनुसरून यावर्षी "बालकाच्या पहिल्या 6 वर्षांतील मेंदूचा विकास" (बचपन के पहिले 6 साल, पोषण-पढाई के लिये है बेमिसाल) ही मुख्य संकल्पना राबविली जात आहे. या अभियानांतर्गत लोकसहभाग वाढवून त्याचे 'जन आंदोलनात' रूपांतर करण्याच्या उद्देशाने, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प कार्यालय, नंदुरबार द्वारे विशेष प्रकल्प स्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद नंदुरबारचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश चव्हाण, विस्तार अधिकारी विलास धनगर आणि कनिष्ठ सहाय्यक उमेश शिंदे यांनी केले. श्रीमती उषा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवून पोषण अभियानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प केला.



