*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
*दादर येथे 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील रेल्वे समस्यांचे सादरीकरण, प्रवासी संघटनांची मते, सूचना जाणून घेण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दादर येथे 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी व कोकण विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रेल्वे परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रवाशांच्या मागण्या संदर्भात विचार विनिमय होणार आहे या परिषदेला रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र रेल्वे परिषद 2026 चे निमंत्रक अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र यांनी केले.



