*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
मुंबई(प्रतिनिधी):-शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी, पेंडखळे ता. राजापूर यांच्या तर्फे रविवार दि.19 एप्रिल 2026 रोजी गोदरेज मैदान करीरोड मुंबई येथे शिवशक्ती चषक - 2026 (पर्व पहिले) भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत
BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर
श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघाने द्वितीय क्रमांकावर नाव कोरले तर तृतीय क्रमांक
DCC राजावाडी (आडिवरे) या संघाने पटकावला
या स्पर्धेत वैयक्तिक उत्कृष्ट खेळ करणाऱ्या तुषार बाणे (BCC भार्गवराम देऊळवाडी),
उत्कृष्ट गोलंदाज सूरज बाणे (BCC भार्गवराम देऊळवाडी), उत्कृष्ट फलंदाज दिनेश तरल (श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी, तिवरे)
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (झेल): रुपेश दळवी (DCC राजावाडी, आडिवरे) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्या बद्दल सर्व 16 संघांचे
शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी, पेंडखळे यांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.