*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-नवयुवक सेवा मंडळ शेजवली मुंबई आणि शेजवली ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि 24 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. 24 रोजी सकाळी 8.30 वा. पासून श्री निनादेवी मंदिर पूजा विधी आरंभ, स.10 वा. नेत्र चिकित्सा शिबीर,दु. 12.30 महाप्रसाद, दु. 3.30 हळदीकुंकू समारंभ, सायं 4.30 लहान मुलांच्या स्पर्धा, रात्री 9 वा महिलांसाठी खास 'खेळ पैठणीचा, सन्मान स्त्री शक्तीचा' हा कार्यक्रम होणार आहे. 25 रोजी स. 8.30 नवचंडी होम, दु.12.30 महाप्रसाद, सायं 5 वा. शोभा यात्रा, सायं 7 वा हरिपाठ (गाव आजिवली) आणि रात्री 9 वा. रेकॉर्ड डान्स व गायन स्पर्धा होणार आहे. 26 एप्रिल रोजी 6 वा. देवीचा अभिषेक, पूजन, स.8 श्री सत्यनारायण महापूजा, स. 9 वा. श्री आई निनादेवी गाव - वाल्ये, श्री आई निनादेवी गाव - पन्हाळे, श्री आई निनादेवी गाव - जुवाठी, श्री देव आदिनाथ गाव - वायंगणी, श्री आई जुगाईदेवी गाव - कोर्ले, श्री आई भराडीदेवी गाव - बांदिवडे, श्री आई महालक्ष्मी गाव - उपळे, श्री देव गांगेश्वर गाव - गुंजवणे आदी गावांतील देवी-देवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. दु. 13 महाप्रसाद, दु. 3.30 सामुहिक ढोलवादन, सायं 4 वा. सामुहिक पालखी मिरवणूक सोहळा होईल रात्री 8 वा. संगीत रत्न कै. विलास बुवा पाटील यांचे शिष्य भजन सम्राट श्रीधर मुणगेकर बुवा यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम होईल तर रात्री 9 वा. शेजवली रत्न मनोहर पुंडलिक कदम आणि त्यांचे सहकारी यांचे भजन सादर होणार आहे तसेच रात्री 10.30 वा. कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे दि. 24,25,26 एप्रिल या तीन दिवशी होणाऱ्या सोहळ्याला पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नवयुवक सेवा मंडळ शेजवली मुंबई व ग्रामस्थ मंडळीनी केले असून श्री आई निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याला शेजवलीचे सरपंच श्री मंदार मारुती राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत



