*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
ठाणे(प्रतिनिधी):-बोंडये ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) यांच्या सौजन्याने तसेच मार्लेश्वर पंचक्रोशी मुंबई संलग्न, श्री सांब केदारलिंग बोंडये यांच्या वतीने आयोजित ‘पर्व 1’ टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 उत्साहात पार पडली. ही स्पर्धा रविवारी (दि. 12 एप्रिल) मिलिटरी ग्राउंड, ठाणे (पश्चिम) येथे झाली. स्पर्धेत विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रंगत वाढवली. अंतिम सामन्यात आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. आई शिंब्रादेवी क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक मिळवला, तर हिरादेवी क्रिकेट क्लब, निवधे संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले.
वैयक्तिक गटात आई शिंब्रादेवी क्रिकेट संघाच्या राजेश हातीम यांना मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. योगेश सालप (आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ) यांना सर्वोत्तम गोलंदाज, तर शुभम कुळ्ये (श्री राजकोजी रेवाळे वाडी, आंगवली) यांना सर्वोत्तम फलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला.