ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जनगणना 2027 साठी नंदुरबार जिल्हा पूर्णतः सज्ज, मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जनगणना 2027 साठी नंदुरबार जिल्हा पूर्णतः सज्ज, मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी*

  • Share:

*जनगणना 2027 साठी नंदुरबार जिल्हा पूर्णतः सज्ज, मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरनोंदणी व गृहगणना प्रक्रियेसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्वंकष व नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून, प्रशिक्षण, मनुष्यबळ नियोजन सर्व स्तरांवर वेगाने काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
भारतीय जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनगणना 2027 चा पहिला टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वयंगणना स्वरूपात राबविण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरगणना (House Listing and Housing Census) केली जाणार आहे. या कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत, असेही सौ. संघवी यांनी कळविले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध स्तरांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. दिनांक 1 जानेवारी 2026 तसेच 23 ते 25 मार्च 2026 या कालावधीत तालुका स्तरावरील प्रभारी अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी तसेच जिल्हा जनगणना अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय, यशदा, पुणे मार्फत 14 ते 17 मार्च 2026 दरम्यान जिल्ह्यासाठी नियुक्त दोन मास्टर ट्रेनर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ते 11 एप्रिल 2026 दरम्यान जिल्ह्यातील 58 फिल्ड ट्रेनर्सना जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत तालुका स्तरावर नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगणकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाव, पाडे, वाडे-वस्ती तसेच शहरी भागातील प्रभाग व वार्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरगणना करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जनगणना कार्यासाठी व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 58 फिल्ड ट्रेनर्स, 3 हजार 91 प्रगणक (राखीवसह) आणि 517 पर्यवेक्षक (राखीवसह) कार्यरत राहणार आहेत. या मनुष्यबळाच्या सहाय्याने जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वस्ती व शहरी भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनगणना प्रक्रियेला व्यापक जनसहभाग मिळावा यासाठी जनगणना संचालनालया मार्फत तयार करण्यात आलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ध्वनीफिती, व्हिडिओ, मराठी गीते, घोषवाक्ये, बॅनर व फलक यांचा वापर करून विविध माध्यमांतून प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे. जनगणना ही राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, शासनाच्या विविध योजना व धोरणांच्या आखणीसाठी यातील माहितीचा आधार घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन अचूक व सत्य माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, पारदर्शक, अचूक व सर्वसमावेशक जनगणना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशा संघवी यांनी स्पष्ट केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
April, 22 2026
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
April, 22 2026
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
April, 22 2026
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
April, 22 2026
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
April, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज