ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध होऊया, 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’-डॉ. रविंद्र सोनवणे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध होऊया, 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’-डॉ. रविंद्र सोनवणे*

  • Share:

*हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध होऊया, 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’-डॉ. रविंद्र सोनवणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):- पावसाळ्याची चाहूल लागताच कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर, जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध: आता हे शक्य आहे” ("Driven to End Malaria: Now We Can. Now We Must" ) हे घोषवाक्य दिले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
आजारांचे स्वरूप आणि प्रसार,
हिवताप (मलेरिया) हा ‘प्लाझमोडियम’ या परोपजीवी जंतूंमुळे होणारा आणि मादी ॲनाफिलीस डास चावल्यामुळे पसरणारा आजार आहे. याव्यतिरिक्त डेंगी व चिकुनगुण्या यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा प्रसार ‘एडीस इजिप्ती’ डासामुळे, तर हत्तीरोगाचा प्रसार ‘क्यूलेक्स’ डासामुळे होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास हे आजार प्राणघातक ठरू शकतात.
डासांची पैदास रोखणे का गरजेचे?, डास प्रामुख्याने मानवी रक्तातील प्रथिनांचा वापर अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी करतात. साठलेले पाणी, उघडी गटारे, टायर, भंगार सामान आणि बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी ही डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. डासांच्या विविध सवयींमुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक असते, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. नागरिकांनी घ्यायची खबरदारी, घराभोवतालचे खड्डे व साचलेली डबकी बुजवावीत. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे लावावीत.
आठवड्यातून किमान एक दिवस पाणी साठवण्याची भांडी घासून पुसून कोरडी करावीत (कोरडा दिवस पाळावा). फ्रिज, कुलर, फ्लॉवर पॉट्स, कुंड्या, डबे व अन्य वस्तुंमध्ये पाच दिवसापेक्षा जास्त काळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत. मोठ्या पाणी साठ्यांमध्ये डास अळी खाणारे ‘गप्पी मासे’ सोडावेत. आरोग्य विभागाचे आवाहन, कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो. त्यामुळे ताप आल्यास तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन रक्ताची मोफत तपासणी करून घ्यावी. हिवताप आढळल्यास पूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे, कारण अर्धवट उपचार घेतलेला रुग्ण पुन्हा आजार पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षण आणि फवारणी मोहिमेत जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल नंदुरबारच्या विध्यार्थ्यांसाठी युवारंग फाउंडेशनकडून प्रथमोपचार पेटी भेट*
April, 22 2026
*पेंडखळेतील शिवशक्ती चषकाचा विजेता BCC भार्गवराम देऊळवाडी (देवाचे गोठणे) तर उपविजेता ठरला श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तरळवाडी (तिवरे) संघ*
April, 22 2026
*कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
April, 22 2026
*शेजवली गावची ग्रामदेवता आई श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
April, 22 2026
*बोंडये ग्रामविकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई संघ विजेता, आई शिंब्रादेवी संघ उपविजेता*
April, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज