*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
*महाराष्ट्र लागोरी संघाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी, पालघरच्या नेतृत्वाचा दबदबा*
मुंबई(प्रतिनिधी):-लगोरी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (LSFI) तर्फे हरियाणातील रेवाडी येथील गुरुकुलम द स्कूलच्या मैदानावर 10 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित 8 व्या सब-ज्युनिअर नॅशनल लागोरी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांनी कांस्य पदक (तृतीय क्रमांक) पटकावून राज्याचा गौरव वाढवला. महाराष्ट्र राज्याच्या या दुहेरी यशामागे पालघर जिल्हा सचिव मुग्धा लेले यांचे मोलाचे सहकार्य आणि तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र संघाच्या दोन्ही गटांचे नेतृत्व पालघरच्या खेळाडूंनीच केले:
राजू चौधरी (पालघर) कर्णधार, मुलांचा संघ.
किन्नरी जोगळे (पालघर) कर्णधार, मुलींचा संघ. नियोजनामुळे आणि विशाल निषाद व बरकत शेख यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट चपळाई दाखवली. विजेत्या महाराष्ट्र संघातील खेळाडू
विभाग खेळाडूंची नावे आणि जिल्हे -
मुलांचा संघ राजू चौधरी (कर्णधार - पालघर), यश शेठ (उपकर्णधार पुणे शहर), निलेश यादव (पालघर), शौर्य कांबळे, देव मोरे, आदित्य काळभोर, प्रज्वल बाबर, शौर्य रेणुसे (सर्व पुणे शहर), आफताब शेख, ओम दिवेकर, साई दिवेकर, रोहन दिवेकर (सर्व पुणे ग्रामीण), मोहित बुटेले, वेदांत देवरे (संभाजीनगर).
मुलींचा संघ किन्नरी जोगळे (कर्णधार पालघर), मेघा सागर (उपकर्णधार पालघर), ध्रिती काळगुटकर, जान्हवी पारेकर, पूर्वजा चावुल्या, निधी सरोदे, जिया राणे (सर्व पालघर), श्लोका साखरे, रुहिका मानकर, आर्या सांगोलकर (पुणे शहर), तनिष्का काकडे, दिव्या बारवकर, प्राजक्ता टेंगले (पुणे ग्रामीण). स्पर्धेचे स्वरूप आणि अंतिम निकाल
हरियाणा लागोरी असोसिएशनच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, चंदीगड यांसह 10 राज्यांनी सहभाग घेतला होता. मुले बिहारने सुवर्णपदक पटकावले, तर महाराष्ट्राने कांस्य पदकावर नाव कोरले. मुली यजमान हरियाणाने सुवर्णपदक जिंकले, तर महाराष्ट्राच्या मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला.
आयोजन आणि मान्यवर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास मुख्य अतिथी म्हणून संदीप बोहरा (माजी अध्यक्ष) उपस्थित होते. तसेच LSFI चे सेक्रेटरी जनरल तुषार व्ही. एम. जाधव, मुख्य पंच राजेंद्र पाटील, प्रवीण जाधव, सचिव जैवीर डूडी आणि संयुक्त सचिव रविंदर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. पालघर जिल्हा सचिव मुग्धा लेले मॅडम यांच्या समर्पित मार्गदर्शनामुळेच आज राज्याला हे राष्ट्रीय यश मिळाले आहे. तसेच लागोरी असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी विजेत्या खेळाडूंना वैयक्तिकरित्या भेटून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल संपूर्ण क्रीडा वर्तुळातून मुग्धा, हेमंत म्हात्रे आणि विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे!



