*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
*शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग 2026–पर्व 1 यशस्वीरीत्या संपन्न*
नालासोपारा(प्रतिनिधी):-शिवशक्ती मित्र मंडळ आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग (SSPL – 2026, Season 1) ही भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेला स्थानिक क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.
मंडळाचे संस्थापक अशोक भानसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष शंकर भेकरे (मामा), उपाध्यक्ष संदीप धुरी, सचिव प्रकाश करवंदे, खजिनदार दैवत भेकरे, सहखजिनदार श्री. मदन धुरी आणि सल्लागार सुहास पारकर यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेतील अंतिम सामन्यात बर्जो बॉईज या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले. या संघाचे मालक कु. निखील तपासे असून संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
तसेच उपविजेतेपद AJ7774 (संघमालक अल्पेश जोशी) यांनी पटकावले, तर तृतीय क्रमांक विघ्नेश फायटर (संघमालक शैलेश पवार) आणि चतुर्थ क्रमांक गायडीयन्स संघ (संघमालक मनोहर सावर्डेकर) यांनी मिळवला. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महेश मोरे(विघ्नेश फायटर) यांना मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज आदेश गमरे (बर्जो बॉईज), उत्कृष्ट गोलंदाज ऋषभ भेकरे(AJ 7774 संघ)यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा खेळाडूंच्या उत्साह, शिस्त आणि क्रीडाभावनेत पार पडल्याने आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.



