*आरक्षण उपवर्गीकरणाला बसपाचा विरोध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आरक्षण उपवर्गीकरणाला बसपाचा विरोध*
*आरक्षण उपवर्गीकरणाला बसपाचा विरोध*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बहुजन समाज पार्टीच्या नंदुरबार जिल्हा युनिटकडून अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला आहे. अनंत बदर समितीची स्थापना असंवैधानिक असून समितीने संबंधित जातींचे प्रतिनिधित्व न घेता आणि अहवाल जाहीर न करता काम केल्याचा आरोप करण्यात आला.
शासनाने अत्यल्प मुदतीत आक्षेप मागवून तत्काळ सुनावणी जाहीर केल्याने प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे बसपाचे मत आहे. समितीचा अहवाल तात्काळ जाहीर करावा, आक्षेप नोंदवण्यासाठी किमान एक महिन्याची मुदत द्यावी व सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही देण्यात आला.
हे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राम्हणे, जिल्हा प्रभारी, जितेंद्र तायडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला जाधव, विश्वास पवार, राजेंद्र महाले, ललित पानपाटील, रत्ना पवार आदी उपस्थित होते.



