*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
*विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त "स्विम फॉर इक्वालीटी" जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-16 एप्रिल 2026 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भारताला समतेचा मूलमंत्र देणाऱ्या महामानवास अभिवादन करण्यासाठी स्विम फॉर इक्वलिटी या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आमंत्रित जलतरण स्पर्धा 2026 चे आयोजन नंदुरबार जिल्हा जलतरण असोसिएशन यांच्या मान्यतेने तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदुरबार डॉक्टर विक्रांत दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले. दरम्यान स्पर्धेचे उद्घाटक आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी प्रमुख अतिथी अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी होते, यावेळी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक निलेश देसले, नगरसेवक दीपक दिघे, रवींद्र पवार, कुणाल वसावे, वंदना साळुंखे, प्रवीण गुरव, मुन्नाभाई पटेल, जय रघुवंशी, भरत चौधरी, जितेंद्र मराठे, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, एडवोकेट प्रवीण वाघ, राजेंद्र निमाडते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्ते विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन अनुक्रमे आमदार राजेश पाडवी तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते गन फायर करून करण्यात आले. सदर जलतरण स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून एकूण 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समता युवा मंच तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरीट नाका परिसर पदाधिकारी राहुल रामराजे, रुपेश बत्तीसे, गौतम पानपाटील, जवाहर पवार, महेंद्र बाविस्कर, सचिन पिंपळे, सिद्धार्थ साळुंके, मुकेश पगारे, विवेक शिरसाट, नरेंद्र बाविस्कर, सौरव साळुंके, पुष्कर आगळे, गौरव परदेशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.दिनेश बैसाणे, कोच राहुल काळे, नंदू पाटील, प्रा.मयूर ठाकरे, कोच राहुल काळे, प्राध्यापक खुशाल शर्मा, कोच अमोल भोये, संदीप खलाणे, जगदीश वंजारी, जगदीश बच्छाव, योगेश बेदरकर, नरेंद्र पाटील, राकेश आव्हाड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दिनेश बैसाणे यांनी केले.



