*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
*दुर्मिळ डुमरिल काळतोंड्या साप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील सर्पमित्राने बाहेरपुरा परिसरतून दुर्मिळ प्रजातीचा डुमरिल काळतोंड्या साप पकडून त्याला नैसर्गिक वातावरणात सोडून बचाव केला. नंदुरबार तालुक्यातील बाहेरपुरा परिसरतून घराच्या भिंतीला लागून शांत बसल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरीकांनी सर्पमित्र ओम कोडग, यांना दुरध्वनी केला. सर्पमित्र बाहेरपुरा परिसरत दाखल झाले. ओम कोडग यांनी या सापाला पकडले. या सापीचे नाव डुमरिल काळतोंड्या असे आहे. तपकिरी मातकट शरीर, काळ्या रंगाचे डोके आणि टोकदार शेपटी यावरुन या सापाला सहज ओळखता येते. काळतोंड्या या सापाची सरासरी लांबी 25 सें.मी. ते जास्तीत जास्त 46 से.मी. असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर आहे. हा बिनविषारी जातीचा साप आहे. काळतोंड्या सापाचे खाद्य लहान पाली, किडे किंवा इतर छोटे साप हे आहे. हा साप पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो. कोणत्याही ठिकाणी साप किंवा इतर वन्यप्राणी आढळून आल्यास त्याला न मारता त्वरित सर्पमित्रला संपर्क करावा, सर्पमित्र ओम कोडग यांनी सांगितले.



