*श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी*
*श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी*
मालवण(प्रतिनिधी):-मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 दरम्यान संपन्न झाला. या दरम्यान त्यांनी मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, उद्योजक सागर हडकर, उद्योजक उमेश बिरमोळे, उद्योजक परशुराम पाटकर, व्यावसायिक संजय गावडे, माजी नगरसेवक यतीन खोत तसेच वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष राजन गिरप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. 14 मे 2026 रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा होता असे श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे. श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हापरिषद सदस्य क्षमा हडकर, डॉ साठे, राजन परब, बिळवस मानसी पालव, दत्तप्रसाद पेडणेकर, विलास मेस्त्री अशा मान्यवरांची भेट घेतली.