*बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*बामखेडा महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागातील डॉ. वाय. सी.गावीत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकार्य कार्य व त्यांनी केलेले योगदान याविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एच. एम. पाटील यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे याविषयी त्यांनी विविध उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एस.पी.पाटील, प्रा.गणेश पडघे नाईक महाविद्यालय शहादा व डॉ.प्रवीण बोरसे रावल महाविद्यालय दोंडाईचा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. निकुंभे यांनी केले. तर आभार प्रगटन डॉ.के. पी. पाटील यांनी केले.या अभिवादन प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



