*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
*छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले सेवा समाप्ती न करण्याच्या संदर्भात आदेश कायम इतर लाभ मिळण्याच्या मार्ग मोकळा तक्रारदार उत्तम भगतसिंग पाडवी, राहणार भगदरी, तालुका अक्कलकुवा, यांनी विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे, यांच्या विरुद्ध माननीय कामगार न्यायालय धुळे येथे सेवा समाप्तीची नोटीस अयोग्य व बेकायदेशीर ठरवून मिळविण्यासाठी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणात अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे तक्रार भा.द.वि. कलम 409,477, 468 व 34 प्रमाणे नोंदवण्यात आली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्कलकुवा, यांनी शिक्षेचे आदेश पारित केले होते. परंतू, सत्र न्यायालय शहादा यांनी निर्दोष मुक्तीचे आदेश पारित केले होते. कामगार न्यायालय धुळे, यांनी सदर तक्रार मंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे, यांनी सदर आदेशाला आव्हान देणारे पुनर्निरीक्षणअर्ज माननीय औद्योगिक न्यायालय धुळे येथे दाखल केले होते. सदर आदेशाला आव्हान देणारे रिट याचिका मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे) यांनी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे माननीय सत्र न्यायालय शहादा यांनी पारित केलेले निर्दोष संदर्भात आदेश व इतर बाबींच्या सखोल विचार करून रिट याचिका फेटाळून माननीय औद्योगिक न्यायालय यांनी पारित केलेले आदेश कायम करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय पारित केलेले आहेत. तक्रारदारतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.



