*जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’साठी अर्ज करण्याचे आवाहन-मंगेश वाघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’साठी अर्ज करण्याचे आवाहन-मंगेश वाघ*
*जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’साठी अर्ज करण्याचे आवाहन-मंगेश वाघ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’ची (PM Internship Scheme) घोषणा करण्यात आली असून, नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेद्वारे युवकांना देशातील आघाडीच्या 500 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची आणि आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. योजनेची ठळक वैशिष्ट्ये,
मासिक विद्यावेतन (Stipend): निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रुपये 9 हजार विद्यावेतन दिले जाईल. कालावधी ही इंटर्नशिप 6 किंवा 9 महिन्यांसाठी असेल. विमा संरक्षण: प्रत्येक इंटर्नला 'प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना' आणि 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने'चे संरक्षण दिले जाईल. पात्रता निकष, वय अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता: हायस्कूल, उच्च माध्यमिक (HSC), आयटीआय (ITI), पॉलिटेक्निक डिप्लोमा, पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी किंवा पदवीधर (BA, BSc, BCom, BBA इ.) उमेदवार पात्र आहेत. निवासी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. महत्त्वाची अट ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत, ते या योजनेसाठी पात्र नसतील. तसेच आयआयटी (IIT), आयआयएम (IIM) आणि मोठ्या प्रोफेशनल पदव्या असलेले उमेदवार या योजनेच्या कक्षेबाहेर आहेत.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक तरुणांनी अधिकृत पोर्टल www.pminternship.mca.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि बँक खाते तपशील आवश्यक आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील तरुणांना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची आणि स्वतःचे करिअर घडवण्याची ही मोठी संधी आहे. भविष्यातील रोजगारासाठी सक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या युवकांनी या पोर्टलवर नोंदणी करावी, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



