*नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा-डॉ.संजय राठोड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा-डॉ.संजय राठोड*
*नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा-डॉ.संजय राठोड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार येथे नोकरीला लावून देतो असे सांगून पैशांची मागणी करणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. रुग्णालय प्रशासनाने ही एक शासकीय संस्था असून या ठिकाणी वर्ग-3 आणि वर्ग-4 पदांची कोणतीही थेट भरती केली जात नाही. वर्ग-3 पदांची भरती थेट शासनाकडून केली जाते. तसेच महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी पदे (outsourcing) भरण्यासाठी शासनाने 'मे. स्मार्ट सर्व्हिसेस लि.' या खाजगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीमार्फतच मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो.
जर कोणी व्यक्ती नोकरीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीस रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार नाही. फसवणूक टाळण्यासाठी किंवा यासंदर्भात तक्रार असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक 02564-210444 वर संपर्क साधावा किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी, असेही जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



