ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*के.डी.गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा  शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
शहादा(प्रतिनिधी):-केडी गावित प्राथमिक विद्यामंदिर परिवर्धा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. दिपाली शांतीलाल मराठे, एकनाथ बागले व त्यांच्या पत्नी  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले_
यानंतर इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी दिशा शेवाळे हिने भारतीय संविधानाची उद्देशिका आत्मविश्वासाने आणि स्पष्ट उच्चारात तोंडपाठ सादर केली. तिच्या सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांची भव्यता आणि लोकशाही मूल्यांची ताकद प्रत्येकाच्या मनात ठसली. हा कार्यक्रमाचा प्रेरणादायी क्षण ठरला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” तसेच “जेथे एकता तिथे सुरक्षितता” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या बालपण, शिक्षण आणि जीवनकार्यावर भाषणांद्वारे आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातून जिद्द, स्वप्न आणि उज्ज्वल भविष्याची आशा स्पष्टपणे जाणवत होती.
उपशिक्षिका श्रीमती मनीषा गणेश पाठक यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा प्रभावी आढावा घेतला. वर्गाबाहेर बसून सुरू झालेल्या शिक्षणापासून ते अथक परिश्रम व ज्ञानाच्या बळावर देशाचे मार्गदर्शक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी प्रेरणादायी शब्दांत मांडला. मुख्याध्यापक विपुल नवले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला समानता व न्यायाचा अधिकार प्राप्त झाला आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात दृढ झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते, ते आपल्या भारतात जन्माला आले हे सर्व भारतीयांचे सदभाग्यच आहे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गोडवा, समता आणि प्रेरणा यांची आठवण राहावी, शाळेतील  बाबासाहेबांच्या विचारांचा गोड, समतेचा आणि एकतेचा संदेश होता. तसेच भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना एकनाथ बागले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले, हा क्षण विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर प्रेरणादायी ठरणारा ठरला. परिवर्धा शाळेत उत्साहात साजरी झालेली ही जयंती जिद्द, एकता आणि शिक्षणाच्या शक्तीचा जिवंत आदर्श ठरली. या कार्यक्रमातून एकच संदेश स्पष्ट झाला परिस्थिती कितीही कठीण असली तरी विचार आणि शिक्षणाची ज्योत पेटती ठेवली, तर प्रगतीचा मार्ग नक्कीच खुला होतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती शितल मोरे  यांनी केले. या प्रेरणादायी उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. दिपाली मराठे, एकनाथ बागले व त्यांच्या पत्नी तसेच  शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.छाया पाटील, मालाबाई भिल, संगीता शेलार , प्रवीण गिरासे, सुकलाल शेलार, सोनू कोळी, सर्व ग्रामस्थ,व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
May, 09 2026
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
May, 09 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
May, 09 2026
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
May, 09 2026
*बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी 37 हजार 599 जात प्रमाणपत्रे अवैध*
May, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज