*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-हनुमान मित्र मंडळ (साईलवाडा) आरवली या मंडळाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त 1 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती उत्सवाचे औचित्य साधून मंडळाकडून राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्पर्धकांकडून आणि प्रेक्षकांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला, या स्पर्धेत जवळपास 35 स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली, तसेच या स्पर्धेचे परीक्षण उत्तम कोरिओग्राफर योगेश मोहिते, अपूर्वा थत्ते आणि सचितानंद शिर्के यांनी उत्तम जिथे पार पाडले, यामध्ये विजय झालेले स्पर्धक खालील प्रमाणे
ठाण्यावरून आलेली श्राव्या पाटणकर यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला, द्वितीय क्रमांक शुभ्रा गांगण आणि कृपा सुद, तृतीय क्रमांक शाम मालदार (चिपळूण), सुंदर जाधव (लांजा), चतुर्थ क्रमांक नेत्रा आंबेकर (राजापूर),
पाचवे क्रमांक सृष्टी मेस्त्री (डेरवण), पार्थ पारकर (चिपळूण), या सर्वच विजयी स्पर्धकांचे मंडळाकडून खूप कौतुक करण्यात आले आणि स्पर्धकांना मंडळ कडून खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.



