*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-8 एप्रिल 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र व आजी माजी मुख्याध्यापक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे कार्यकारिणी संचालक सुरेश मुरारी पोवार तसेच
रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण कु-हाडे, राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव संजय मांडवकर, राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भारत कांबळे यांचे हस्ते जगदिश भालशंकर माजी मुख्याध्यापक राजापूर हायस्कूल, अभय मुणगेकर माजी मुख्याध्यापक प्रिंदावण हायस्कूल, प्रकाश साखळकर माजी मुख्याध्यापक वडवली हायस्कूल, तानाजी देसाई माजी मुख्याध्यापक पाचल हायस्कूल, संभाजीराव केळुसकर माजी मुख्याध्यापक सौंदळ हायस्कूल, प्रकाश गुरव माजी मुख्याध्यापक कुंभवडे हायस्कूल तसेच अशोक इंगळे मुख्याध्यापक शिवणे खुर्द हायस्कूल, नारायण कोले मुख्याध्यापक कुंभवडे हायस्कूल,
सौ.राजश्री नारे मुख्याध्यापिका जैतापूर हायस्कूल आदी सेवानिवृत्त व आजी मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. जैतापूर हायस्कूलच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुरेश पोवार यांनी संस्थेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष विजय पाटील
रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी अरूण कुऱ्हाडे
तसेच राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भारत कांबळे व सचिव संजय मांडवकर यांचा जैतापूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. विजय पाटील यांनी संच मान्यता, फुलराणी कक्ष, स्कॉप माहिती भरणे या विषयांवर मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व विशद केले.
मुख्याध्यापकांनी शालेय कामकाज करताना खुले आम केले पाहिजे.तसेत ते काम मी चांगलेच करणार हा आत्मविश्वास स्वतःला असला पाहिजे. शासकीय परीपत्रकातील आपल्या शालेय प्रशासनाला आवश्यक असलेल्या गोष्टी शोधून नेमकेपणाने अर्थबोध समजून घेऊन कामकाज करावे. आपला मित्र असणाऱ्या मुख्याध्यापकांशी शालेय प्रशासनासंदर्भात चर्चा करून एखादी समस्या तात्काळ सोडवता येते.
तसेच विविध प्रशासकीय गोष्टी कशा हाताळाव्यात याचे मार्गदर्शन केले. प्रकाश साखळकर, जगदिश भालशंकर यांनी माजी मुख्याध्यापक सत्कार प्रसंगी आभार पर मनोगत व्यक्त केले. नंदकुमार महाले मुख्याध्यापक देवाचे गोठणे हायस्कूल
श्री.रविंद्र जाधव सर.मुख्याध्यापक.नाटे हायस्कूल. यांनी विशेष सहकार्य केले राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री संजय मांडवकर सर यांनी संच मान्यता 2025- 26 संदर्भात राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे प्रयत्न, जिल्हा मुख्याध्यापक संघासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सांगितले.तसेच संच मान्यतेचा 15 मार्चचा शासन निर्णय हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो रद्द होणार नाही, तसेच याचा परिणाम कोकणातील फक्त 16 ते 18 टक्के कर्मचाऱ्यांवर होणार असल्याने सदरची बाब मा.मुख्यमंत्री,मा.शिक्षणमंत्री, मा. पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून कोकणातील या शाळांना खास बाब म्हणून किंवा विशेष बाब म्हणून सूट मिळावी अशा आशयाचा ठराव मंजूर करून घेतला.
शेवटी कृतीसत्र यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल, तसेच माजी मुख्याध्यापक यांनी आपला बहुमोल वेळ देऊन या कृतीसत्राला उपस्थिती लावली
जैतापूर एज्युकेशन संस्था तसेच जैतापूर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री नारे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे आजचे राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कृतीसत्र यशस्वी झाले.त्याबद्ल सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



