*गुन्हेगारास पाठबळ देणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. शाळेवर तात्काळ शासकीय प्रशासक नियुक्त करा यासाठी उबाठा गटाचे धरणे आंदोलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुन्हेगारास पाठबळ देणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. शाळेवर तात्काळ शासकीय प्रशासक नियुक्त करा यासाठी उबाठा गटाचे धरणे आंदोलन*
*गुन्हेगारास पाठबळ देणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. शाळेवर तात्काळ शासकीय प्रशासक नियुक्त करा यासाठी उबाठा गटाचे धरणे आंदोलन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंदोलनाचा चौथा दिवस असून जर पुढील 24 तासांच्या आंत संबंधीत मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांवर (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल झाली नाही तर सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाचे रुपांतर तीव्र जनआंदोलनात केले जाईल. प्रशासन नेमण्यासाठी शासन स्तरावर आमरण उपोषण छेडले जाईल अथवा या प्रकरणातील प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करु अशा स्वरुपाचा अंतिम कायदेशिर इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. शिक्षक उमेश अशोक शिंदे याने श्रीमती. डी. आर. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीस फुसलावुन पळवत तिच्यावर अत्याचार केला. आरोपी वर गुन्हा दाखल असून आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहे.
मुख्य आरोपी अटकेत असला तरी, या गुन्हयात त्याला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत करणारे आणि पुरावे दडवणारे मुख्याध्यापक व संस्थाचालक अद्याप कायदयाच्या कचाट्यातुन बाहेर आहेत. जर शिक्षण विभागाने 24 तासांच्या आंत मुख्याध्यापक व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर विद्यार्थी आणि पालकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकासह संचालक मंडळावर पोक्सो स्वरुपाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, शाळेची सखोल चौकशी व्हावी यासाठी शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात सहभागी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रमुख पंडीत कौतिक माळी, रमेश नामदेव पाटील, सुनिल रामा पवार, दिनेश एन. सोनवणे, अक्षय श्रीखंडे, डॉ. हेमंतकुमार शर्मा, इस्मीयाज कुरेशी, खंडु माळी, निंबा पाटील, बापु राजपुत, शेखर जाधव, निलेश चौधरी, सौ. सोनल चव्हाण, सौ. संगीता खंडु माळी, सौ. दिलाली वाघ, सागर पाटील, आनंदा पाटील, विक्की, पंकज माळी, कल्पीत नाईक, बबलु सोनार, बापु धनगर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.



