*जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे रेल्वे स्थानकात थांबा द्यावा यासाठी पत्रकार सुरेश गुडेकर यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे रेल्वे स्थानकात थांबा द्यावा यासाठी पत्रकार सुरेश गुडेकर यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
*जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे रेल्वे स्थानकात थांबा द्यावा यासाठी पत्रकार सुरेश गुडेकर यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
पाचल(प्रतिनिधी):-लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी पाचल पुर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी खासदार नारायण राणे यांना दिले आहे. जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, ही येथील जनतेची गेले अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. कोकणात रत्नागिरी नंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई- विलवडे असा रोज प्रवास करत असतात. प्रवास करीत असताना काही ठराविक गाड्या या स्थानकात थांबतात. त्यामुळे या चाकरमानी यांना व्हाया प्रवास करत विलवडे स्थानक गाठावे लागते. परिणामी घरी पोहचेपर्यंत बराच वेळ वाया जातो. पर्यायाने मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विलवडे स्थानक परिसराच्या आजुबाजूच्या जवळपास 70 ते 80 गावातील प्रवासी रोज प्रवास करीत असतात. जनशताब्दी हि एक महत्त्वाची गाडी आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगांव जंक्शन रोज धावते. विलवडे स्थानकात हि गाडी थांबल्यास लांजा, राजापूर, वैभववाडी आणि शाहूवाडी (कोल्हापूर) अशा चार तालुक्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे. प्रवाशांच्या सोयीची असणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे स्थानकात थांबा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि सुरेश गुडेकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे.



