*शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासाठी काम करणे आवश्यक-आ. चंद्रकांत रघुवंशी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासाठी काम करणे आवश्यक-आ. चंद्रकांत रघुवंशी*
*शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासाठी काम करणे आवश्यक-आ. चंद्रकांत रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर प्राध्यापकांनी वाचन, लेखन, चिंतन हे केलेच पाहिजे. त्याबरोबरच संशोधन आणि पेटंट क्षेत्रातही स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे झाले तर समाज आणि शिक्षण संस्थेसाठी ते हिताचे ठरेल असे विचार आमदार व नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांनी जी. टी. पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या गुणगौरव प्रसंगी मांडले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.एम. जे. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. एम.जे .रघुवंशी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा मांडताना, आपले महाविद्यालय सर्वोत्कृष्ट कसे आहे, शैक्षणिक कामकाजाच्या व्यतिरिक्त खेळ, कला, साहित्य, सांस्कृतिक व संशोधन क्षेत्रात कशी प्रगती केली आहे या संदर्भात विचार मांडले. यावेळी चेअरमन चंद्रकांत रघुवंशी व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या शुभहस्ते बेस्ट कॉलेज, बेस्ट इव्होल्युशन सेंटर, ए प्लस ज्युनिअर कॉलेज,करिअर कट्टा, बेस्ट डिपार्टमेंट, विद्यापीठात प्रथम आलेले विद्यार्थी, अविष्कार स्पर्धेत, युवा रंग स्पर्धेत विजेचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्पोर्ट्स मध्ये नैपुण्य प्राप्त केलेले विद्यार्थी, पेटंट, रिसर्च पब्लिकेशन, बुक्स, प्रोजेक्ट यासंदर्भात प्राध्यापकांनी केलेली कामगिरी, विविध कार्यशाळेच आयोजन करणारे विभाग आणि शासकीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करणारे प्राध्यापक या सर्वांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. माधव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुलतान पवार यांनी मानले.



