*आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी केलेल्या नवस फेडण्यासाठी मुस्लिम कार्यकर्ते अजमेर शरीफ ला रवाना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी केलेल्या नवस फेडण्यासाठी मुस्लिम कार्यकर्ते अजमेर शरीफ ला रवाना*
*आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी केलेल्या नवस फेडण्यासाठी मुस्लिम कार्यकर्ते अजमेर शरीफ ला रवाना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रकृती बिघडली होती. त्यांची तब्येत चांगली व्हावी यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या बऱ्याच जणांनी नवस केले. हिंदू मुस्लिम बांधवांनी आपापल्या परीने नवस केले होते. त्यातच मुस्लिम कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी अजमेर शरीफ येथे येऊन दर्शन करू असे नवस येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी केले होते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रकृती चांगली झाली असून आजारपणातून बाहेर निघाल्यानंतर त्यांच्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी येथील मुस्लिम कार्यकर्ते एसटी बस करून राजस्थान मधील अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी बुधवारी रात्री निघाले ते गुरुवारी दर्शन घेणार आहे. या ठिकाणी नवस फेडण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांसह नगरसेवक परवेज खान ही उपस्थित होते. एसटी बसने रवाना होण्यापूर्वी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रवास सुखाचा होवो या सदिच्छा दिल्या.



