*नरसी येथे भाजपा स्थापनेचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसी येथे भाजपा स्थापनेचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न*
*नरसी येथे भाजपा स्थापनेचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न*
नांदेड(प्रतीनिधी):-देशातील नंबर एकचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील नरसी (ता.नायगांव) येथे 6 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे. भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वतीने संपर्क कार्यलय परीसरात आयोजित ध्वजारोहन सोहळा माजी मुख्यमंत्री तथा अशोक चव्हाण यांचे बंधू भाऊराव चव्हाण, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, यांच्या हस्ते पार पडला
याप्रसंगी माजी आमदार राम पाटील रातोळीकर, चेअरमन नरेंद्र चव्हाण, गोविंदराव नागेलीकर, राजेश देशमुख कुंटूंरकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, गोविंदराव कुंटूंरकर, शंकर पाटील कल्याण, धनराज शिरोळे, आनंदराव बावणे, विजय होपळे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, माजी चेअरमन मारोती पा. भिलवंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करावे
नरेंद्र चव्हाण
कार्यक्रमात इंधन दरवाढीचा विचार करता इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करावी जेणेकरून उसाच्या बगॕसपासून इथेनॉल निर्मितीला मोठा वाव मिळेल असे मत चेअरमन नरेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच औद्योगिक व कृषी संधींचा वेध घेवून आगामी काळात आपल्या नायगांव तालुक्यातील कुष्णूर एमआयडीसी परिसरात हेलिपॅड प्लांट उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना तांत्रिक शिक्षण, विशेषतः डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण द्यावे असे आवाहन केले.
याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे येत्या काळात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढवून या संधीचा लाभ घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमातून भाजपाच्या वर्धापनदिनाला स्थानिक पातळीवर विकास, उद्योग आणि शेती यांचा समन्वय साधण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी नरसीचे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, माजी सरपंंच व्यंकटराव कोकणे, माजी चेअरमन मारोती पा. भिलवंडे, जेष्ठ कार्यकर्ते शंकर पा. कल्याण, धनराज शिरोळे, आनंदराव बावणे, परमेश्वर गुरुजी, माधवराव गजभारे, हणमंत मिसे, नारायण खनपट्टे, उत्तम बोधने, इस्माईल सय्यद, वसंत कस्तुरे, मारोती वाडगावे, माधव तेलमवार, बालाजी चिंतावार, त्र्यंबक डाके, सायबू मेटकर, राम खनपट्टे, विनोद भिलवंडे, दिगांबर भिलवंडे, गणेश भिलवंडे, सुनील वडगावे, कैलास पांचाळ, शिवा मेटकर, फारूक पटेल, संतोष बोधणे, लक्ष्मण बोधणे, शिवकांत पाटील, शिवराय पाटील, दत्ता हरी पाटील, शेळगावकर, शिवाजी पाटील वडजै, संजय मोरे, राजेंद्र पाटील कुंचेलीकर आदींची मोठ्या संखेने उपस्थीती होती.



