*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
*नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर बाबत आंदोलन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गॅसच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, छोट्या व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत गॅसची कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवावी, काळाबाजारावर कठोर कारवाई करावी, गॅस वितरणातील अटी शिथिल कराव्यात, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत आणि परिस्थिती कधी सुरळीत होणार याबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले यात वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे आणि सर्व पदाधिकारी व कारकर्ते यांनी आंदोलनाची भूमिका मांडली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे जिल्हा उपाध्यक्ष
जितेंद्र पाटील, अजय निकुंभे,
सुरेश सूर्यवंशी महिला गाडी जेष्ठ कार्यकर्ते राणी गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
कल्पना गावित, जिल्हा प्रवक्ता सुनिल कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष नयन भिल, जिल्हा कोषाध्यक्ष देवबा पिंपळे, प्रसिद्धीप्रमुख निलेश गुलाले, तालुकाध्यक्ष विशाल समुद्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



