*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
*लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या परस्पर सहकार्याने वाल्ये गावातील इंगळेवाडी आदर्श करण्याचा निर्धार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे वाल्ये गावातील इंगळेवाडी मुंबई व ग्रामीण मंडळाने "एकमेका साहाय्य, करु, अवघे धरु सुपंथ" या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि इंगळेवाडी विकास मित्र मंडळाने एकमेकांना सहाय्य करत तालुक्यात इंगळेवाडी आदर्श वाडी निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. गावातील सर्व पायवाटा, रस्त्याची कामे मंडळाने स्वनिधीतून केली आहेत मंडळाने आगामी विकास कामांची यादीच जाहीर केली आहे जल मिशन योजना, वाडीतील उर्वरित पायवाटा व रस्त्यांची कामे, स्मशानभूमीची दुरुस्ती व देखभाल, गणेश विसर्जन रस्ता व गणेश विसर्जन ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करणे, मंडळाचे कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, वाडीची वेबसाईट तयार करणे, मंडळाच्या कामकाजात ए.आय. तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) वापर, राई व स्मशानभूमीची मोजणी करून सभोवताली कुंपण बांधणे, माळावरती खेळाचे मैदान, कुंपण व सभोवताली उत्पन्न देणारी झाडे लावणे, दरवर्षी एक गावी व एक मुंबईत कौटुंबिक मेळावे आयोजित करणे, गणपती, होळी महोत्सवासाठी गावी जाणाऱ्या सभासदांच्या जाण्या - येण्याचा वाहतूक व्यवस्थेबाबत उपक्रम/सर्व सभासदांना टी शर्ट वाटप, पार ते भाटी धूप प्रतिबंधक बंधारा व बाजूला 3 फूट चालण्यासाठी पट्टी व स्मशानभूमीच्या कुंपणाच्या बाजूला 3 फूट चालण्यासाठी पट्टी तयार करणे अशा भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचा मंडळाने निर्धार केला आहे. तसेच आमदार किरण सामंत, जि.प. सदस्य रमेश सूद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, खासदार नारायण राणे आणि ग्रामपंचायत वाल्ये यांच्या सहकार्याने वाडीचा विकास करण्याचा निर्धार केला आहे मंडळाचे मुंबई अध्यक्ष संदीप दत्ताराम मिशाळ आणि ग्रामीण समिती अध्यक्ष लवू शिवराम इंगळे तसेच मुंबई - ग्रामीण समितीचे पदाधिकारी ग्रामीण मंडळाचे सल्लागार राम मांजरेकर, नारायण इंगळे व मंडळाचे उप खजिनदार महेश इंगळे आदी अहोरात्र धडपड करत इंगळेवाडी एक आदर्श वाडी निर्माण करण्याचा मंडळाने ध्यास घेतला आहे याकामी मुंबई मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक दिपक मुरारी इंगळे यांनीही ग्रामविकासला वाहून घेतले आहे.



