*लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण
*लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण*
तळोदा(प्रतिनिधी):-प्रोटिएन यांच्या सहकार्याने आणि ईगल लाईव्हलीहूड फाउंडेशन याच्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये आशाए या प्रकल्पाच्या अंतर्गत आकार मुलींचे स्कॉलरशिप कार्यक्रम सुरुवात करण्यात आले आहे. या स्कॉलरशिपच्या अंतर्गत तालुक्यातील 20 शाळांना लाभ मिळणार आहे. तसेच 950 मुलींना याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा त्यांना होणार आहे. मागील वर्षात सुद्धा, 950 मुलींना आकार मुलींची शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आलेला होता. सदर स्कॉलरशिपच्या अंतर्गत आठवी, नववी, दहावी मधील मुलींचा समावेश आहे. आणि याचे काही निकषानुसार मुलींना स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे. आकार मुलींचे स्कॉलरशिप याची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार नमन गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच तळोदा शिक्षण विभागाच्या माध्यमातून समन्वयांनी तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे. या स्कॉलरशिपचा उद्देश मुलींना मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच वित्तीय सहायता करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे. आकार मुलींच्या स्कॉलरशिपमुळे नक्कीच मुलींना शैक्षणिक प्रवासामध्ये फायदा होईल आणि शैक्षणिक जीवनात त्यांना सहकार्य मिळेल. आकार मुलींचे स्कॉलरशिपच्या वितरणाच्या वेळेस शिक्षण विभागातील तालुका शिक्षण अधिकारी शेखर धनगर, तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील तसेच शिक्षक मंगल पावरा उपस्थित होते. आकार मुलींचे शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता दहावी गटातून राजनंदनी छगन पाडवी, संजना लक्ष्मण नाईक, इयत्ता नववी मधून राधिका उखळ्या शेवाळे मुलींना शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात आली. आकांक्षीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदामध्ये आकार मुलींचे स्कॉलरशिप मुलींना देण्यासाठी ईगल लाईव्हलीहूड फाउंडेशन आणि प्रोटिएन यांचे पालकांनी, मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी विशेष आभार मानले आहेत.



