*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
*अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे मंडळाचे काम कौतुकास्पद-सुरेश गुडेकर*
पाचल(प्रतिनिधी):-अध्यात्माच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या हातदे येथील रामेश्वर समता संवर्धक मंडळाचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. ज्यानी आपल्या कुटुंबांसाठी पर्यायाने आपल्या गावासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आशा एकशे एक जेष्ठ नागरिकांचा सन्मान करुन समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी केले. मंडळाच्यावतीने हातदे येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमा निमीत्त जेष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश गुडेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जेष्ठ नागरिकांचा सन्मान करुन समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर यांनी केले. मंडळाच्यावतीने हातदे येथे श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमीत्त जेष्ठ नागरिकांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश गुडेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ. सिध्दांली मोरे, पंचायत समिती सदस्या सौ. अपेक्षा मासये, सौ. समिक्षा वाफेलकर, पाचल केंद्र प्रमुख अनादी मासये, सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकपाळ गुरूजी होते. यावेळी बोलताना सिध्दांली मोरे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तर सौ अपेक्षा मासये बोलताना म्हणाल्या मंडळाचे नावातच समता असलेल्याने सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून छान कार्यक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री हनुमान जन्मोत्सवा निमीत्त भजन, पुजन, होमहवन, प्रवचन, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चव्हाण यांनी केले. यावेळी मुंबई मंडळ आणि स्थानिक मंडळाचे पदाधिकारी संजय चव्हाण, दिगंबर चव्हाण, प्रभाकर नार्वेकर, विद्यानंद मोरे, हरिदास चव्हाण, मंगेश चव्हाण आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



