*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
*श्री, स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल पाचल दिवाळवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर 2 च्या राज्य सरकारी नवोदय विद्यालय परीक्षेत पास होवून यश संपादन केलेल्या विद्यार्थी यांना श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठान संस्थापक -संजीव शिवाजी सुतारतर्फे प्रमाणपत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे तारकमंत्र असलेली पुस्तीका विद्यार्थी यांना देण्यात आली. त्या वेळी उपस्थित असलेले वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ सुरेश सुतार आणि जीवन सुतार यांच्या हस्ते कु. मनस्वी जिवन सुतार, कु. स्वरा कृष्णकांत सुतार, कु. पायल सतिश सुतार, कु. प्रियल अजित गोरुले, कुमार निर्मित विकास सुतार, कु. गार्गी सुनिल सुतार, या सर्वांना मान्यवरांनी प्रमाण पत्र देवून शाळेतील शिक्षिकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. शिर्के, यांनी समालोचन करून कार्यक्रमाची धुरा संभाळली. त्यांच्या सहकारी शिक्षिका पाटील यांनी सर्वांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



