*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
*ताम्हाणे हायस्कूलचे मोतीराम कडू आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित*
ताम्हाणे(प्रतिनिधी):-राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श लिपिक पुरस्काराने माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणेचे लिपिक (क्लार्क) मोतीराम अंतू कडू यांना गौरविण्यात आले
कडू हे ताम्हाणे कडूवाडीचे सुपुत्र असून त्यांची 1 जुलै 1986 मध्ये लिपिक म्हणून नेमणूक झाली तेव्हा
शाळा विनाअनुदानित होती. 6 वर्षे त्यांनी विनावेतन काम केले. ते 39 वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत कडू यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र केळकर व माजी अध्यक्ष गजानन पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



