*विभागीय कराटे स्पर्धेत 150 खेळाडू मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील मुलींची चमकदार कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विभागीय कराटे स्पर्धेत 150 खेळाडू मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील मुलींची चमकदार कामगिरी*
*विभागीय कराटे स्पर्धेत 150 खेळाडू मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील मुलींची चमकदार कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण होळतर्फे हवेली नंदुरबार येथील 8 मुलींनी
विभागीय कराटे स्पर्धेत पाच सुवर्ण पदक व तीन रजत पदक जिंकून शाळेचे वर्चस्व कायम राखले सर्व यशस्वी मुलींचे अभिनंदन जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी अभिनंदन केले. यावेळी सुंदरसिंग वसावे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व विवेकानंद चौहान विशेष अधिकारी यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व इंडीयन ॲडवेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हायस्कूल येथे आयोजित विभागीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनच्या सहसचिव प्रिती पालिकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे सचिव गणेश मराठे उपाध्यक्ष नरेंद्र माळी, किरण शिरसाठ, निता मराठे आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेत पंच म्हणून विशाल सोनवणे, अमित पाडवी, पवन बिराडे, दुर्गेश धनगर यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या. स्पर्धेत टेबल जज म्हणून हर्षवर्धन भदाने, नेहा महाजन भूमि मराठे यांनी सहकार्य केले. स्पर्धेला जवळपास 150 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये काता इव्हेंट आणि कुमीती इव्हेंट (फाईट) असे दोन प्रकार होते. यात 14 वर्षा आतील मुलींमध्ये अंकिता पिंपळे, प्रांजली जावरे, प्रियंका पवार, निलम वसावे, तेजस्विनी अहिरे यांनी सुवर्णपदक मिळविले. तसेच रविना कोकणी, गंगा शिंदे, पूर्वी पिंपळे यांनी रजत पदक जिंकले. स्पर्धेचे निरीक्षण अध्यक्ष संतोष मराठे यांनी केले सुत्र संचालन गणेश मराठे तर आभार विवेक पालीकर यांनी मानले.



