*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
ओणी(प्रतिनिधी):-खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे"
साने गुरुजींच्या विचारांची पेरणी करून माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्यासाठी संस्कारमय वातावरण निर्माण करून देणारे, निसर्गाच्या सानिध्यात शारिरीक श्रमांतून फुलणारी आणि मानसिक स्वास्थ्य देणारे, संघर्षयात्रा केलेल्या मान्यवरांच्या ग्रेटभेटीतून वैचारिक खाद्य देत विविध चर्चासत्रातून बौद्धिक मशागत करणारी, जगण्याचं भान देताना प्रश्न विचारण्यासह स्वतःला शोध वृत्तीकडे नेणारे, स्वभान सह समाजभानाचा दृष्टीक्षेप दाखविणारे, मुलांमध्ये राष्ट्रभक्ती सह मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाण करून देणारे शिबिर म्हणजे राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिर.सदर राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचा
कालावधी 25 ते 29 एप्रिल 2026 (5 दिवस) पर्यंत असून हे शिबिराचे स्वरूप निवासी असून 10 वर्षांपासूनचे पुढील व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकतात. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक बाबासाहेब नदाफ आणि 5 प्रशिक्षकांची टीम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. सदरचे शिबिर नूतन विद्या मंदिर हायस्कूल, ओणी, मु. पो. ओणी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - 416705 येथे होणार आहे
समाजातील असंख्य दात्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच अशा शिबिरातून राष्ट्र भक्तीचे धडे गिरविले जातात. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दानशूर व्यक्तींनी सढळहस्ते सहकार्याचा हात द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे सदर शिबिरासाठी प्रवेश नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
08652067888 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



