*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
*अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी 'अभियान सन्मान' उपक्रम संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला 'अभियान सन्मान' हा उपक्रम राबवला जातो. त्याच्या 75 व्या पुष्पाचे आणि कलाश्रम या संस्थेचा नवव्या वर्धापन दिनाचे निमित्त घेऊन स्वरसाधक आम्ही गायक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्याला अभिनेते, निर्माते भरत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने कराओके स्पर्धकांचे शिवाय पुस्तक प्रकाशन, गेल्या पंचवीस महिन्यातल्या सूत्रसंचालिकांचा सन्मान असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. पु. ल. देशपांडे, रवींद्र नाट्यमंदिर लघु नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. हा संपूर्ण कार्यक्रम आदर्श गृहिणी आशालता आवटी, ज्येष्ठ रंगकर्मी सहदेव कळसुलकर, आदर्शमाता जयश्री थरवळ या दिवंगतांना समर्पित केलेला होता. अमृत महोत्सवी पुष्पाचे निमित्त घेऊन जेष्ठ रंगकर्मी सहदेव कळसुलकर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन 'सहदेव सदैव कराओके' स्पर्धेचे आयोजन केले होते. या कराओके गायकांसोबत विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलाकारांना निमंत्रित केले होते. त्या प्रत्यकाने या कलाकारांसोबत आपला कलाविष्कार सादर करणार केला. नाटककार आणि विज्ञान प्रचारक अशोक हसोळकर यांची ज्ञान विज्ञान कथन, सिंहासन घाला चुलीत, तो दिवस उगवलाय ही तीन पुस्तके भरत जाधव यांच्या हस्ते प्रकाशित झाली. या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ, प्रस्तावना, रेखाचित्र नंदकुमार पाटील यांची आहेत. प्रत्येक महिन्याला गुणी कामगाराच्या मुलाला अव्वल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा कामगार पुत्र, बहुचर्चित 'गांधी टॉक्स' या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक किशोर बेळेकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. आदर्श श्रमिक पांडुरंग परब आणि आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा पुरस्कार असतो. जेष्ठ रंगकर्मी अशोक परब यांच्याबरोबर माध्यम तज्ञ, साहित्यिक रवींद्र आवटी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटळकर, लेखक, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक रामनाथ थरवळ यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले होते. यानिमित्ताने कामगार चळवळ आणि त्यांचे योगदान साऱ्या गोष्टीला इथे उजाळा दिला.



