*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत शा. ज. नटावदकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार येथील शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर नंदुरबार येथे सिल्वर झोन फाउंडेशन अंतर्गत इंटरनॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सायन्स ओलंपियाडची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. इयत्ता पहिलीच्या वर्गातून आयुष केशव जाधव, सानवी रामचंद्र तांबोळी, अंकुश प्रद्युत समंता, जानवी पंकज पवार तसेच इयत्ता दुसरीच्या वर्गातून आदेश धनंजय बेडसे, इयत्ता तिसरीच्या वर्गातून कार्तिक आशिष पाटील, गीत राकेश कुमावत अशा एकूण सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तसेच विधी राकेश कुमार अहिरे (इ.1ली), शिवानी ज्ञानेश्वर राजपूत( इ.3 री), रसिका स्वप्नील सोनार (इ. 4थी), अशा एकूण तीन विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल प्राप्त झाले. तसेच तेजस प्रकाश झांजरे (इ. 1 ली), अर्षती शहेन्द्र गावीत (इ. 3 री) तनिष्का कांतीलाल वसावे (इ. 4थी) अशा एकूण तीन विद्यार्थ्यांना ब्रांझ मेडल प्राप्त झाले. एकूण 13 विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र पालकांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या गुणगौरव कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. मराठे, एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, ज.ग.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अरुप गोस्वामी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर, ब्रांझ मेडल्स व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक पुनम बागुल व आभार प्रदर्शन दिव्या पवार यांनी केले. शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.



