*डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” संपन्न*
*डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवर, शास्त्रज्ञ व उपस्थित शेतकरी बांधवांच्या हस्ते भूमातेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धन व मातीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
प्रास्ताविक करताना सौ. आरती देशमुख, कृषी विज्ञान केंद्र यांच्या शास्त्रज्ञांनी मातीच्या आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन तसेच शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माती सुपीक ठेवणे हे उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उमेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात जमिनीची गुणवत्ता खालावण्याची प्रमुख कारणे जसे की रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, मृदा धूप, सेंद्रिय पदार्थांची कमतरता याबाबत माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मातीचे सुपोषण कसे करता येईल, जीवामृत, घनजीवामृत, आच्छादन (मल्चिंग) आणि पिकपद्धतीतील बदल यांसारख्या उपाययोजनांव त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी सक्रिय सहभाग घेत विविध शंका विचारल्या व तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले. या अभियानामुळे माती संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. या वेळास डाब गावातील सरपंच अशोक वसावे यांनी त्यांच्या भाषेमध्ये गावातील शेतकऱ्यांना आवाहन केलं सर्वांनी भूमी सुपोषण आपल्या शेता मध्ये करावे.
शेवटी सर्व उपस्थितांनी मातीचे आरोग्य जपणे, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.



