*22वी राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत: नंदुरबार जिल्ह्याची दमदार कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*22वी राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत: नंदुरबार जिल्ह्याची दमदार कामगिरी*
*22वी राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत: नंदुरबार जिल्ह्याची दमदार कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नाशिक येथे संपन्न झालेल्या 22 व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 10 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य पदके पटकावली आहेत. या भव्य स्पर्धेचे आयोजन जम्परोप फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27 ते 30 मार्च दरम्यान करण्यात आले होते. ही स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात आदी राज्यांमधून सुमारे 540 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या खेळाडूंनी. जानवी वसावे भाव्या गवळी, स्मिता वसावे, प्रांजल खेडकर, गलवी पटेल सिंगल लाँगरोप स्पीड या प्रकारात सुवर्णपदक मिळविले, अनुज जव्हेरी, राहुल सुळे, चैतन्य देसले, आदित्य जमदाळे, ओम गोसावी यांनी डबल अंडर पिअर या प्रकारात सुवर्णपदक मिळविले, निर्मल पिंपरे कौशल् कोळी 30 सेकंद डबल अंडर पिअर या प्रकारात रौप्यपदक, मिळविले उत्कृष्ट कौशल्य हिताक्षी सोनवणे 30 सेकंद स्पिड या प्रकारात रौप्यपदक मिळविले, कैवल्य खंडारे, अनुज पाडवी 3 मिनिट इंडोरस या प्रकारात कांस्यपदक मिळविले तन्वी चौधरी, प्रचिता गावित, भाग्यश्री चौधरी धनश्री पाडवी यांनी 30 सेकंद स्पिड रिले या प्रकारात कांस्यपदक मिळविले जिद्द दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध गटांमध्ये खेळाडूंनी प्रभावी प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली. नंदुरबार जिल्ह्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, भविष्यातील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार आहे. या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे. विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा जम्परोप असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच प्रशिक्षक. जिल्हा जम्परोप असोसिएशन सचिव रामा हटकर कुणाल अंबेकर नितीन सोनार तुषार सोपनर जगदीश जाधव गजेंद्र सुळ यांचे मार्गदर्शन लाभले व पालकांचेही कौतुक केले. त्यांनी खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



