*पोक्सो गुन्हयातील आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड*
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नवापुर पोलीस ठाणे हद्दीतोल इसम नामे रायसिंग माल्या काथुड, वय 33, मुळ रा. शेरुला, ता. सोनगड (गुजरात) हा त्याचे सासऱ्याकडे कामानिमित्त डोगळीफळी, घोडजामने, ता. नवापुर येथे वास्तव्यास असतांना महिला फियांदी यांची 13 वर्षीय पिडीत बालिका ***** ही त्यांच्या घरी टीव्ही पाहण्याकरीता जात असे, बाच गोष्टीचा फायदा घेत रायसिंग काल्या काथुड याने सदर बालिकेस त्याचे सासऱ्याचे नवीन घराचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घेवून जावुन जिवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने 3 ते 4 वेळेस बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर पिडीत बालिकेची प्रकृती खराब झाल्याने ती गर्भवती असल्याचे तिचे पालकांचे निदर्शनास आले होते. सदर बाबत फिर्यादी यांनी त्यांच्या पिडीत बालिकेस झालेल्या घटनेविषयी विश्वासात घेवून विचारपूस केली असता पिडीत बालिकेने आरोपी रायसिंग माल्या काथुड याने तिचेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. त्यावरुन नवापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 792/2021, भा.द.वि.क.-376 (2) (एफ) (एन), 506 अन्वये, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 4 प्रमाणे आरोपी रायसिंग माल्या काथुड याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी रायसिंग माल्या काथुड यास तात्काळ पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. नवापुर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार के. आर. पेठकर यांचे समक्ष झाली, सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले, त्यात पिडीत बालिका **** वय -13 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच, तपास अधिकारी तसेच रासायनिक विश्लेषक (डी.एन. ए.तपासणी) यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी आरोपी रायसिंग माल्या काथुड यास भा.द.वि.क.-376 (2) (फ), 376(2) (एन), 363(अ), 506 अन्वये व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे दोषी ठरवत आरोपी यास बीस (20) वर्ष सश्रम कारावास व एकूण रु.20,000 दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.



