*भादवड पीएमश्री जि.प.शाळेत उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्याहस्ते डिजिटल कक्षाचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भादवड पीएमश्री जि.प.शाळेत उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्याहस्ते डिजिटल कक्षाचे उद्घाटन*
*भादवड पीएमश्री जि.प.शाळेत उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्याहस्ते डिजिटल कक्षाचे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्या हस्ते पीएम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, भादवड (ता. नवापूर) येथे अत्याधुनिक डिजिटल कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल डेन पुणे यांच्या सहकार्याने खर्च 27 लाख रु. निधीतून (आयडियल सेंटर) सुसज्ज करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आवश्यक सर्व साहित्य व शैक्षणिक साधने सुस्थितीत प्राप्त होऊन त्याची आकर्षक मांडणी करण्यात आली असून ते पूर्णतः कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या आयडियल सेंटरचा शैक्षणिक वापर सुरू केला असून, डिजिटल माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायी होत आहे. आधुनिक संगणक कक्षाच्या माध्यमातून शिक्षकांना ई-बुक्स व डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन- अध्ययन अधिक सुलभ व परिणामकारक करण्यास मदत होणार आहे. शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग यामुळे शाळेतील गुणवत्तापूर्ण उपक्रमांना नवे बळ मिळत आहे. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पंचायत समिती नवापूर गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख कैलास सूर्यवंशी, केंद्रीय मुख्याध्यापक संजय शंकरराव देवरे तसेच हरकलाल रामदास गांगुर्डे, श्रीमती प्रमिला गणेश कोकणी, गिरीधर सदाशिव गावीत, श्रीमती भाग्यश्री धुलजी वळवी, शमुवेल यशवंत गावीत, श्रीमती सुशिला सिंगू वळवी, राजेश देविदास कोकणी, शिवदास कालूसिंग पावरा, शांतीलाल पुनाजी साळवे, मच्छिंद्र दत्तू पाटील तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांचीही विशेष उपस्थिती लाभली. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. डिजिटल ई-बुकचे महत्व उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये डिजिटल ई-बुक्सचा वापर अत्यंत आवश्यक बनला आहे. डिजिटल ई-बुकचे महत्व सुलभ उपलब्धता विद्यार्थी कोणत्याही वेळी आणि कुठूनही मोबाईल, टॅब किंवा संगणकावर ई-बुक्स सहज वाचू शकतात. पर्यावरणपूरक शिक्षण: कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते. अद्ययावत माहिती: डिजिटल पुस्तकांमध्ये नवीन माहिती लगेच अपडेट करता येते, त्यामुळे विद्यार्थी नेहमी ताज्या ज्ञानाशी जोडलेले राहतात. आकर्षक शिक्षण: चित्र, व्हिडिओ, ऑडिओ यांचा समावेश असल्यामुळे शिक्षण अधिक रंजक आणि समजण्यास सोपे होते. खर्चात बचत: छापील पुस्तकांच्या तुलनेत ई-बुक्स कमी खर्चिक असतात. स्व-अभ्यासाची संधी: विद्यार्थी स्वतःच्या गतीने अभ्यास करू शकतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शेवटी त्यांनी सांगितले की, डिजिटल ई- बुक्समुळे शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसमावेशक बनत असून, भविष्यातील शिक्षणासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यावेळी भादवड केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैलास सूर्यवंशी तसेच भादवड शाळेचे मुख्याध्यापक पंतू गावित यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या उल्लेखनीय सेवेस गौरव करण्यात आला. आपल्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अनुभव संपन्न मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडले असून शिक्षक बांधवांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



