*इंटरनॅशनल मॅथ्स् ओलंपियाड परीक्षेत श्रॉफच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इंटरनॅशनल मॅथ्स् ओलंपियाड परीक्षेत श्रॉफच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*
*इंटरनॅशनल मॅथ्स् ओलंपियाड परीक्षेत श्रॉफच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड या प्रतिष्ठित परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या परीक्षेत तब्बल विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून घवघवीत कामगिरी केली आहे. इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड ही परीक्षा सायन्स ओलंपियाड फाउंडेशन (एसओएफ) यांच्यामार्फत घेतली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक स्पर्धा आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता, समस्यांचे निराकरण करण्याची कौशल्ये आणि गणितातील सखोल समज यांची कसोटी लागते. पारंपरिक पाठांतरापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करून नवीन उपाय शोधण्याची क्षमता या परीक्षेत आवश्यक असते. त्यामुळे या परीक्षेत मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचे प्रतीक मानले जाते. या यशामागे विद्यार्थ्यांची प्रचंड मेहनत आणि चिकाटी दडलेली आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच अतिरिक्त सराव प्रश्नपत्रिका सोडवून, अवघड गणिती संकल्पना समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वेळेचे योग्य नियोजन, सतत पुनरावृत्ती, शंका निरसन सत्रे आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी यामुळे त्यांनी आपली गुणवत्ता अधिकाधिक वाढवली. अनेक विद्यार्थ्यांनी शालेय वेळेनंतरही अतिरिक्त अभ्यास करून या परीक्षेसाठी स्वतःला तयार केले.
सुवर्णपदक विजेते विद्यार्थी असे
इयत्ता पाचवीतून आयुष दीपक येशी, प्राची सुनील मराठे, विक्रांत भरत पाटील. इयत्ता सहावीतून रोशन संजय बेंद्रे, कुणाल किशोर पाटील, जय सत्यभान पाटील.
इयत्ता सातवीतून समता गोपाल महाजन, उज्वल सयाजीराव पाटील, आरव जयेश वाणी.
इयत्ता आठवीतून मानसी गुलाब पाटील, मयंक अनिल दीक्षित, किंजल राहुल बडगुजर. इयत्ता नववीतून ललित राहुल बडगुजर, ओमकुमार भूपेंद्र आभणे, प्रिशा राकेश पटेल. इयत्ता दहावीतून ओम मनोज पवार, यथार्थ नितेश सूर्यवंशी, आयुष किरण पाटील. या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात विशेष सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका सुषमा मनीष शाह, उपमुख्याध्यापक प्रशांत बागुल, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना किशोर रौंदळ, मनीषा कलाल, हर्षिता पाटील, सुनील राणा, वर्षा पाटील, सुनील गिरासे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.



