*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
*जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जामिया कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे“ग्रंथालयातील ई-संसाधनांचा वापर” या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश बी.एड. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणे तसेच शैक्षणिक ई- संसाधनांचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा होता. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी-शिक्षकांना विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन शैक्षणिक साधनांची ओळख करून देण्यात आली. तसेच अध्यापन- अध्ययन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय ग्रंथपाल डॉ. सैयद नूर मोहम्मद यांनी विशेष व्याख्यान दिले. त्यांनी एनडीएलआय (NDLI), डेलनेट (DELNET), ई-जर्नल्स, ई-बुक्स तसेच इतर मुक्त शैक्षणिक संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्याच्या प्रत्यक्ष पद्धतींचे प्रात्यक्षिकही त्यांनी सादर केले. ग्रंथपाल डॉ. नूर मोहम्मद यांनी आधुनिक शिक्षणामध्ये डिजिटल ग्रंथालयांचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच संशोधन कौशल्य वाढविण्यासाठी या साधनांचा सक्रियपणे वापर करावा, असे आवाहन केले. हा कार्यक्रम सर्व सहभागींसाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ई-संसाधनांच्या वापराबाबत जागरूकता, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढीस लागला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



