*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
*कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायाक समिती संचलित सौ. विमल बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग,
दिनांक 31 मार्च 2026 सौ. विमल बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “कुशल नर्सिंगद्वारे नवजात शिशूंच्या आजारपण व मृत्यू दराचे प्रतिबंध” या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम एनटीव्हीएस नर्सिंग ऑडिटोरियम येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. एस. रघुवंशी उपस्थित होते. तसेच CPD निरीक्षक सुशील नाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शैक्षणिक प्रक्रियेचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये मान्यवर वक्ते श्रीमती.अश्विनी राजपूत, वैभव भोसले आणि मेघश्याम घोलप, श्रीमंती योगिनी सपकाळे, अंजली तङवी यानी नवजात शिशूंची काळजी, नवजात पुनरुज्जीवन (Neonatal Resuscitation), सामान्य नवजात आजारांचे व्यवस्थापन, कांगारू मदर केअर तसेच कमी वजनाच्या बाळांची काळजी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सहभागी नर्सिंग व्यावसायिकांना 10 महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC) क्रेडिट पॉइंट्स प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिचारिका, नर्सिंग विद्यार्थी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ज्ञानवृद्धी साधली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती, प्राध्यापकवर्ग तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण वळवी यांनी उत्कृष्टरीत्या केले. आभार प्रदर्शन कु. सोनल गावित यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक मधूर वळवी, शंकर वसावे, वंदना वळवी ममता कोळी, तसेच कर्मचारी अशोक धोबी, अमोल गवळी, कल्पना चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.



