*जन्मकल्याणक महोत्सव कुसुंब्यात उत्साहात मिरवणूकीत सर्वधर्मीयांकडुन मंगल आरती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जन्मकल्याणक महोत्सव कुसुंब्यात उत्साहात मिरवणूकीत सर्वधर्मीयांकडुन मंगल आरती*
*जन्मकल्याणक महोत्सव कुसुंब्यात उत्साहात मिरवणूकीत सर्वधर्मीयांकडुन मंगल आरती*
कुसुंबा(प्रतिनिधी):-विश्वाला जगा व जगू द्या असा संदेश देणारे अहिंसेचे महान पुजारी जैन धर्मीयांचे 24 वे बअंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक दि.30 मार्च (सोमवार) रोजी कुसुंबा येथे अति भव्यप्रमाणात मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहाने प्राचीन क्षेत्रावर महोत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे जन्मकल्याणक दिनानिमित्त नगरात 24 मार्चपासून (मंगळवार) सात दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांने महोत्सवाची सुरुवात झाली. अशी माहीती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख प्राचीन क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. महावीरांची तत्वप्रणालीची सामाजिक गरज लक्षात घेता जनजागृती करण्यात आली. त्यास भाविकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. 30 मार्च (सोमवार) रोजी सकाळी आठ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह सजवलेल्या पालखीद्वारे भव्य दिव्य शोभायात्रा गल्ली क्र.3 येथुन निघाली.सर्वधर्मीयांकडुन मंगल आरतीने शोभायात्रेचे स्वागत झाले. भगवान महावीर, कुंथुंनाथ भगवान, अहिंसा परमो धर्माच्या जयघोषाने नगरी गजबजून गेली. शोभायात्रा जात असताना काही महीला पुरूष आपल्या घराच्या ओट्यावरूनच हात जोडून वंदन करीत होते. दिवसभर महावीर मार्ग गजबजला होता. रांगोळीतुन शोभायात्रेचे स्वागत झाले. महोत्सवातील शोभायात्रने कुसुंबेकरांचे लक्ष वेधले. भगवान महावीर जिनप्रभावना मिरवणूकीचे जल्लोषात अनेकांनी स्वागत केले. शोभायात्रेचा जैन मंदिरिजवळ समारोप झाला. मंदिरात पुजा, अभिषेक, विश्वशांतीमंत्र वाचन आदि धार्मिक विधिनंतर महाआरती महाप्रसाद रात्री शास्त्र वाचन आदि कार्यक्रम झालेत. पार्श्वनाथ सेवा समितीने विशेष दक्षता घेतली. भगवान महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त समाजबांधवांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.



