*प्रा. डॉ. माधव कदम यांना ना .संजय शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रा. डॉ. माधव कदम यांना ना .संजय शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान*
*प्रा. डॉ. माधव कदम यांना ना .संजय शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक तथा वसुंधरा चॅरिटेबल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव कदम यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा 2024- 25 चा ' राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा' हा मानाचा पुरस्कार 26 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री
संजय शिरसाठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड .राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, समाज कल्याण विभाग मुंबई आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सचिव रवींद्र गोडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ.माधव कदम हे गेल्या 30 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. स्वच्छता अभियान, आरोग्य, तंबाखूमुक्ती, नशामुक्ती, जलसंधारण, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध विषयांबरोबरच' श्यामची आई' या संस्कारक्षम कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. तंबाखूमुक्त शाळांचा नंदुरबार जिल्हा या अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या अनुभवावर तंबाखूमुक्त अभियान एक चळवळ हे आरोग्य संपन्न पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध शिबिरांमध्ये याविषयी कार्यक्रमांचे आयोजन व व्याख्याने दिली. स्वतः तंबाखू मुक्तीची होळी व व्यसनमुक्तीच्या सुभाषितांची गुढी उभारून प्रचार, प्रसार केला. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला. 15000 रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, ॲड.राम रघुवंशी, प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी, समन्वयक एम. एस. रघुवंशी, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.



