*नंदुरबारात तीन साडे हजार रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असतांना, ठिय्यावरच पाच हजार रुपये किंमत मोजलेल्या ठेकेदाराला, उपसा आणि वाहतुक खर्च पाहता वाळू ब्रासमागे पाच हजारांपेक्षा महागणार, मग
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारात तीन साडे हजार रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असतांना, ठिय्यावरच पाच हजार रुपये किंमत मोजलेल्या ठेकेदाराला, उपसा आणि वाहतुक खर्च पाहता वाळू ब्रासमागे पाच हजारांपेक्षा महागणार, मग
*नंदुरबारात तीन साडे हजार रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असतांना, ठिय्यावरच पाच हजार रुपये किंमत मोजलेल्या ठेकेदाराला, उपसा आणि वाहतुक खर्च पाहता वाळू ब्रासमागे पाच हजारांपेक्षा महागणार, मग ती बोलीदाराला परवडणार कशी ? या ठिकाणाहुन अवैध रित्या वारेमाप वाळू उपश्याची शक्यता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील वाळू ठिय्यांच्या लागलेल्या बोलीत अमळथे येथील वाळू घाटाला शासनाच्या मूलभूत किमतीपेक्षा तब्बल नऊ पट अधिकची बोली लागली असून दोंदवाडच्या वाळू घाटाला देखील साडेतीन पट अधिकची बोली लागली आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार ब्रासने घरपोच वाळू मिळत असतांना अमळथे येथील वाळूच्या घाटाला लागलेली बोली पाहता जागेवरच हा वाळूचा भाव ब्रासला पाच हजारांहुन अधिकचा असणार आहे. त्यामुळे नऊपट अधिकची किंमत मिळालेल्या अमळथे घाटात दडलय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील आठ वाळू घांटांचा लिलाव काढण्यात आला आहे. लिलावात सात घाटांना शासनाने निर्धारीत केलेल्या मूलभूत किमतीपेक्षा जास्तीची बोली मिळाली आहे. जिल्ह्यात प्रशासनाने सध्या नंदुरबार तालुक्यातील आराळे, ओसर्ली, अमळथे आणि बोराळे तर शहादा तालुक्यातील दोंदवाडे, ससदे, कवथळ तसा आणि फेस अशा आठ वाळू घाटांचा लिलाव काढला होता. मात्र ओसर्ली येथे आलेल्या तीन निविदा धारकांपैकी एकाच्या कागदपत्रात त्रुटी निघाल्यान दोनच निविदा धारक राहिल्याने ओसर्लीच्या वाळू घाटाचा लिलाव पुढे ढकलण्यात आला. सोमवारी उर्वरित आठ घाटांना बोली लागली. यात अमळथे वाळू घाटातून 4961 ब्रास वाळूचा लिलाव करण्यात आला असून याचे निर्धारीत मूल्य हे 26 लाख 78 हजार 940 रुपये इतके ठेवण्यात आले होते. मात्र या घाटाला तब्बल नऊ पट अधिकची बोली लागली असून 4961 ब्रास वाळूसाठी या ठिकाणी 2 कोटी 48 लाख 34 हजार 444 रुपयांची बोली मिळाली आहे. त्यामुळे या घाटातील एका ब्रास वाळूसाठी बोलीदाराला तब्बल पाच हजाराहून अधिकची किंमत मोजावी लागली आहे. मुळातच नंदुरबारमध्ये सध्या तीन साडे हजार रुपये भावाने घरपोच वाळू मिळत असतांना ठिय्यावरच पाच हजार रुपये किंमत मोजलेल्या या ठेकेदाराला उपसा आणि नंतर वाहतुक खर्च पाहता ही वाळू ब्रासमागे पाच हजारांपेक्षा महागणार आहे. मग ती बोलीदाराला परवडणार कशी हा देखील प्रश्न आहे. अशा स्थितीत या ठिकाणाहुन अवैध रित्या वारेमाप वाळू उपश्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच याठिकाणी प्रशासन दिलेली वाळू उपसण्याच्या अनुशंगान काय यंत्रणा तैणात करते हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. मात्र या ठिय्याला लागलेल्या या नऊपट अधिकच्या बोलीने या अमळथ्या मध्ये दडलय तरी काय असाच काहीसा प्रश्न उपस्थित झाला आहे. याहुन वेगळी अशीच परिस्थिती दोंदवाडा वाळू ठिय्याची आहे. या ठिकाणी शासनाने 9010 ब्रास वाळूसाठी 48 लाख 65 हजार 400 रुपये किंमत ठेवण्यात आली होती. परंतु, याठिकाणी देखील 1 कोटी 62 लाख 67 हजार 708 रुपये बोली मिळाली आहे. आराळे वाळू ठिय्यातून 2261 ब्राससाठी शासनाने 12 लाख 20 हजार 940 इतकी किंमत ठरवली होती. याठिकाणी बोलीतून 15 लाख 27 हजार 777 रुपये मिळाले आहेत. बोराळे येथील वाळू ठिय्यासाठी 11392 ब्राससाठी शासनाने 61 लाख 51 हजार 680 इतकी किंमत ठेवली होती. या ठिकाणी 64 लाख 54 हजार 444 इतकी बोली मिळाली आहे. ससदेच्या 9159 ब्राससाठी शासनाने 49 लाख 45 हजार 860 इतकी किंमत निर्धारीत केली होती. परंतु, बोलीतून या ठिय्याला 51 लाख 32 हजार 777 इतकी किंमत मिळाली आहे. कवठळ ठिय्याच्या 13780 ब्राससाठी 74 लाख 41 हजार 200 इतकी किमत ठेवण्यात आली होती. मात्र बोलीतून 78 लाख 55 हजार इतकी किंमत मिळाली. तर फेस ठिय्यातील 7950 ब्राससाठी 42 लाख 93 हजार इतकी किंमत ठेवण्यात आली होती. याठिकाणी 51 लाख 55 हजार इतकी बोली मिळाली आहे. या सात वाळू ठिय्याच्या लिलावातून शासनाला 6 कोटी 72 लाख 27 हजार 150 रुपयांचा महसूल मिळणार आहे. मागील काळात निघालेल्या वाळू लिलावातून अनेक अनियमितता, वारेमाप वाळू उपसा, हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन, स्वामित्व पावत्यांवर मॅजीक इंकचा वापर, असे एक ना अनेक प्रकार समोर आले होते. अशातच गेल्या सात ते आठ वर्षांपासून या वाळू ठिय्यांचा लिलाव न झाल्याने य़ाठिकाणाहून आता हजारो ब्रास वाळू निघण्याची शक्यता असल्याने ठेकेदारांनी चढ्या भावांनी या वाळू ठिय्यांना बोल्या लावल्या आहेत.



