*तळोदा येथील खुनाचे गुन्हयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा येथील खुनाचे गुन्हयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
*तळोदा येथील खुनाचे गुन्हयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-25 मार्च 2026 रोजी फिर्यादी महेंद्रभाई वळवी, वय 30 वर्षे, रा. बालंबा, ता. कुकरमुंडा जि.तापी, गुजरात यांचे वडील नामे कांतीलालभाई वळवी, वय- 54 वर्षे, हे काही कामानिमित्त घरातुन निघुन परत आले नाहीत व दुसऱ्या दिवशी दि.26 मार्च 2026 रोजी फिर्यादी यांचे वडील हे सतोना शेत शिवार, ता. तळोदा जि. नंदुरबार येथे मयत अवस्थेत मिळुन आले होते. वैदयकीय अधिकारी यांचेकडून मयताचे शवविच्छेदन होऊन कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने मयताचे डोक्यावर गंभीर दुखापत करुन तसेच दोरीने गळा दाबल्याने झाला असल्याचे मृत्युचे कारण अहवालात स्पष्ट झाल्याने दि.26 मार्च 2026 रोजी तळोदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 173/2026 भा.न्या. संहिता कलम 103(1) प्रमाणे अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एक पथक तयार करुन तपासाला अधिक गती दिली. स्था.गु. शा. प्रभारी हेमंत पाटील व पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती व उपलब्ध पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी कांतीलाल दशरथ पाडवी, वय- 50 वर्षे, रा. शेलवाई, ता. तळोदा जि. नंदुरबार मोगराबाई अजित वळवी, वय- 40 वर्षे, रा.आमोदा, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात यांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शोध घेता ते मिळुन आले असुन त्यांना विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस करता आरोपी मोगराबाई वळवी हीस मयत याचेकडुन होत असलेल्या त्रासाला कंटाळुन त्यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याची
कबुली दिली आहे. नमुद दोन्ही आरोपींना तळोदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकों/दादाभाई वाघ, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, राजेंद्र काटके यांनी केली आहे.



